मलकापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य . रेल्वेकडून - नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूरदरम्यान अनारक्षित विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत. विशेष गाडी क्रमांक ०१२६२ ही ४ डिसेंबर रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता सुटेल. विशेष गाडी क्रमांक ०१२६४ ही ५ डिसेंबर रोजी नागपूर येथून सकाळी ८ वाजता सुटेल. विशेष गाडी क्रमांक ०१२६६ ही ५ डिसेंबर रोजी नागपूर येथून १५,५० वाजता सुटेल. या गाडीचे थांबे जलंब, मलकापूर येथे आहेत, तर दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे,
अतिरिक्त नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्या विशेष
गाडी क्रमांक ०२०४० ही ७ डिसेंबर रोजी नागपूर येथून १३.२० वाजता सुटेल. या गाडीचे थांबे शेगाव, मलकापूर येथे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाड्यांही सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये विशेष गाडी क्रमांक ०१२४९ ही ६ डिसेंबर रोजी मुंबई येथून १६.४५ वाजता सुटेल. नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५१ ही ६ डिसेंबर रोजी मुंबई येथून १८.३५ वाजता सुटेल. नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५३ ही ७ डिसेंबर रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल. नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०२२५५ ही ७ डिसेंबर रोजी मुंबई येथून १२.३५ वाजता सुटेल. नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ३ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ० १२५७ ही ८ डिसेंबर रोजी मुंबई येथून १८.३५ वाजता सुटेल. नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५९ ही ८ डिसेंबर रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाडीचे थांबे दादर, कल्याण, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला येथे आहेत. संरचना दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे राहणार आहेत.

Post a Comment
0 Comments