,गावांतील नागरिक त्रस्त:वाहनचालकांना 15 किमी अंतर जीव मुठीत धरत करावे लागते पार
खुलताबाद ता प्रतिनिधी सनिराम गावंडे
निरगुडी बु ते चिखलठाण या रस्त्याची अत्यंत दयनीय झाली आहे. वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.रस्त्यावर पडलेले खड्डे, चिखल, साचलेले पाण्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे.निरगुडी बु,खु पासून चिखलठाण अंतर केवळ 10 ते 15 किमी आहे.गल्ले बोरगाव व कन्नड ला जोडणारा अत्यंत जवळचा हा मार्ग आहे. या मार्गावरून कन्नड ला 5 ते 8 खेड्यांची दळणवळण व्यवस्था चालते. मात्र, खराब रस्त्यामुळे ही व्यवस्था कोलमडली आहे. खड्डे इतके मोठे आहेत की, या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. नागरिकांत यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडला असून मोठमोठे खड्डे व खाचखळगे पडले आहेत.रस्त्यांवरून गुढघ्या इतकाले पाणी वाहत आहे हा ओढा आहे की रस्ता हेच प्रवाशांना कळायला मार्ग नाही यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. या मार्गावरून वाड्या वस्त्यांवरील शेतकरी दळणवळणासाठी वापर करतात.शाळेतील विद्यार्थी निमडोंगरी(ठाकरवाडी) ते या वाड्यांपासून तिसगाव विद्यालय तिसगाव व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिसगाव या शाळेत पाई पाई ये-जा करणा-या विद्यार्थांचे हाल होत आहे.काही विद्यार्थी स्कुल बसमध्ये येतात तर स्कुल बस मध्ये जावे का पाई जावे विद्यार्थांत संभ्रम निर्माण झाला आहे.जोडलेली गावे खुलताबाद व कन्नड तालुक्यातील पिंप्री, निरगुडी बु, खु ठाकरवाडी,तिसगाव,घुसूर,तांडा,निमडोंगरी,ठाकरवाडी या गावांचा शेती पिकांची वाहतूक व अन्य कामांसाठी याच रस्त्यांचा वापर होतो. हा रस्ता खुलताबाद व कन्नड हद्द असलेली गल्ले बोरगाव व पुढे तिसगाव चिखलठाण गावापर्यंत खूपच खराब आहे.

Post a Comment
0 Comments