मारेगाव- प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील बोटोणी या पेसा गावात जनकल्याण समीती द्वारा सुरु करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अवैध आहे.या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फसवणुक होत असुन येथील उपचाराने रुग्णावर दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण आहे.अशा आशयाची तक्रार शामदादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे कडे करण्यात आली आहे.मारेगाव आरोग्या विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बोटोणी या पेसा गावात अटलबिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय असे नाम फलक लावुन रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.हे रुग्णालय शासन मान्य तथा अनुदानित तत्वावर असल्याचा मोठामोठा गाजावाजा करुन पदभरतीच्या मुलाखती घेतल्या होत्या.
या मुलाखती नंतर मोठ्या प्रमाणात आर्थीक उलाढाल झाल्याची चर्चा बोटोणी परिसरात सुरु आहे. मात्र प्रदीर्घ कालावधी नंतर जाहिराती प्रमाणे पदभरती करण्यात आली नाही. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांची फसवणुक झाली आहे. या अवैध रुग्णालयाची तक्रार यापुर्वी करण्यात आली आहे. संस्था अध्यक्षासह,रवी काळे यांची चौकशी करुन रुग्णाची होत असलेली फसवणुक थांबवावी अन्यथा 3 सप्टेंबर पासून उपोषण करण्यात येईल असा ईशारा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिलेल्या तक्रार अर्जातुन शामदादा कोलाम ब्रिगेडचे संस्थापक,अध्यक्ष सुरेश कुमरे यांनी दिला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची होत असलेल्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता शामदादा कोलाम ब्रिगेडच्या एंट्रीने प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Post a Comment
0 Comments