चिखली : खडकपूर्णा नदीपात्रातून अवैधपणे रेतीचा उपसा केल्यानंतर देऊळगाव घुबे शेतशिवारात शेतकऱ्यांच्या शेतात लपवून ठेवलेला सुमारे १३६ ब्रास रेतीसाठी महसूल विभागाने जप्त केला. तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील अमोना-कोनड रस्त्याला लागून असलेल्या गट. क्रं. ६२७ मध्ये पंजाब दिनकर घुबे यांच्या मालकीच्या जागेत ३० ब्रास, परसराम पांडुरंग घुबे यांच्या मालकीच्या जागेत २० ब्रास तरकांताबाई विजय घुबे यांच्या मालकीच्या जागेत सुमारे ५० ब्रास असा सुमारे सुमारे १३६ ब्रास रेतीसाठा आढळून आला होता.
हा रेतीसाठी जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाने केली आहे. ही कारवाई तलाठी वैशाली गवई व मंडळ अधिकारी सोनुने यांनी केली असून पंच म्हणून निवृत्ती दगडुबा घुबे, समाधान विजय घुबे, संतोष गजानन घुबे, पोलिस पाटील हरीभाऊ जाधव आदी उपस्थित होते. खडकपूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे.

Post a Comment
0 Comments