नांदगाव - (मुक्ताराम बागुल) :-
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील पूर्व भागात असलेल्या मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या बोलठाण येथे नियमित वाहतूक कोंडीची समस्या असते. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून तासनतास येथे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बोलठाण नाका परिसरात वाहतुकीची कोंडी नियमित होत आहे. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव या तीन जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणापासून जवळच असल्याने येथे खरेदी विक्रीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. कृषी उत्पन्न उपबाजार, बँक, पेट्रोल पंप यामुळे नेहमीच वर्दळ असणाऱ्या बोलठाण येथील नाका भागात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
बोलठाण येथील नाक्यावर तासनतास वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, लग्न किंवा महत्त्वाच्या कामासाठी बोलठाण गावातून बाहेर जाणाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. बोलठाण उप बाजार समिती येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने या वाहतूक कोंडीत भर पडते. सदर रस्त्यावरील अतिक्रमण असून त्या अतिक्रमण दुकानांच्या समोर उभी राहणारे वाहने रुंद रस्ता असल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी संबंधित विभागाने कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे
.jpg)
Post a Comment
0 Comments