डोणगांव प्रतिनिधी. गजानन वाघमारे.
श्रीमद् 1008 जगद्गुरू पलसिध्द महास्वामीजी यांचा मुर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन महोत्सवला डोणगांव नगरीत सुरवात झाली असुन दि 19 डिसेंबरला सकाळी 9 वाजता श्री सदगुरू सिध्द चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरु दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,
स्थानिक पलसिध्द धर्मपीठ शाखा डोणगांव च्या वतिने दि 16/12 पासुन वर्धापन दिनानिमित्त श्री ष ब्र 108 प पू शिवाचार्य रत्न,वेदान्ताचार्य सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या प्रेरणेने व सद्गुरू सिध्द चैतन्य शिवाचार्य महाराज, सद्गुरू शिव चैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव, सद्गुरू विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज आष्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न होत आहे,गुरुदिक्षा कार्यक्रम साठी अनेक भावी भक्तांनी नोंद केली आहे,या गुरु दिक्षा कार्यक्रम साठी अनेक विरशैव लिंगायत समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत,
या वर्धापन दिन महोत्सवात दैनंदिन जगद्गुरू पलसिध्द महास्वामीजी यांच्या मुर्तीवर रुद्राभिषेक,पलसिध्द चरित्रामृत व परमहस्य ग्रंथाचे पारायण, सामूहिक भजन व शिवपाठाचे नियोजीत कार्यक्रम सुरू आहेत
गुरु दिक्षा कार्यक्रमाचा परिसरातील सर्व वीरशैव लिंगायत समाज व सर्व समाजातील भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री पलसिध्द सेवा संघ व भावीक भक्त मंडळी यांनी केले आहे,

Post a Comment
0 Comments