भोर तालुका प्रतिनिधी- नरेंद्र यादव.
भोर तालुक्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरणाचे पाणी हिरवे झाल्याने धरणा लगत असलेल्या भाटघर संगमनेर माळवाडी तसेच नऱ्हे या गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, धरणाचे पाणी वापरात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत,प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments