राहुल चव्हाण @ बारामती
बारामती : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. झारगडवाडी गावांचे ग्रामदैवत असलेल्या जय भवानी माता देवी मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक पद्धतीने देवीची मूर्ती सजवून पूजा करण्यात आली.
यावर्षी नवरात्रोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जात असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. घटस्थापनेनंतर पुढील नऊ दिवस मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देवीची पालखी, भजन-कीर्तन आणि रात्रीच्या वेळी गरबा-दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिला आणि तरुणांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. शांततेत आणि सुरक्षित वातावरणात हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

Post a Comment
0 Comments