Type Here to Get Search Results !

पुरग्रस्त बांधवांसाठी मानवीतेचा हात – “फूल नव्हे, फुलाची पाकळी!”



दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ, उमरखेड तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द.


उमरखेड // प्रतिनिधी 

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतीतील पिके वाहून गेली, जनावरांसाठी चारा-अन्नटंचाई निर्माण झाली आणि काहींच्या घरांवर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. अशा कठीण काळात उमरखेड तालुक्यातील दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाने पुढाकार घेत समाजातील संवेदनशीलतेचे आणि मानवतेचे उदाहरण घालून दिले आहे.आज तहसील कार्यालयात आयोजित छोटेखानी पण भावनिक वातावरणात झालेल्या कार्यक्रमात, वार्ताहर संघाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकवीस हजार रुपयांचा (₹21,000) धनादेश उमरखेडचे तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांच्या स्वाधीन करण्यात आला.

या वेळी संघाचे अध्यक्ष डॉ. विशाल माने  यांनी सांगितले की,“शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा खरा पोशिंदा आहे. पुरामुळे बाधित झालेल्या या पोशिंद्यांना आपुलकीचा हात देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. आम्ही दिलेली मदत ही फुल नव्हे, तर फुलाची एक पाकळी आहे – पण त्या पाकळीमधूनही आमच्या मनातील आपुलकी आणि कर्तव्यभावना दिसते.”या प्रसंगी संघाचे सचिव शैलेश ताजवे, उपाध्यक्ष अजय कानडे, कार्याध्यक्ष अझरउल्ला खान, कोषाध्यक्ष निळकंठ धोबे, प्रसिद्धी प्रमुख गजानन भारती, तसेच सदस्य वसंतराव देशमुख, प्रशांत भागवत, अरविंद ओझलवार, लक्ष्मीकांत नंदनवार, साहेबराव धात्रक, व्यंकटेश पेन्शनवार, अविनाश मुन्नारवार, अंकुश पानपट्टे, ताहेर मिर्झा, अरुण बेले, रवी भोयर, भीमराव नगारे, डॉ. शिवचरण हिंगमिरे, संजय देशमुख, संतोष कलाने, सलमान खान आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.या निमित्ताने उपस्थित सर्वांनी एकच भावना व्यक्त केली —

“पुरग्रस्त बांधवांसाठी प्रत्येकाने आपल्या परीने पुढे येणे, हाच खरा समाजधर्म!”

Post a Comment

0 Comments