प्रतिनिधी = गणेश ठाकरे, लासलगाव
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव येथील जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांची पिंपळगाव बसवंत नगरपालिका निवडणूक २०२५ साठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन होळकर हे नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत असून अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या निष्ठावान कार्याचा गौरव म्हणून त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, खासदार शोभाताई बच्छाव, काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, ,शरद आहेर, शिरीष कोतवाल, दिगंबर गीते यांनी त्यांचे स्वागत केले. निरीक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर होळकर यांनी सातत्याने मीटिंगचा धडाका सुरू केला. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्यासाठी अनेक लोक इच्छुक असल्याने पिंपळगाव बसवंत नगरपालिकेमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार सत्तेमध्ये जातील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments