Type Here to Get Search Results !

आ. जयंतराव पाटील :राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा दशसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध





ईश्वरपूर / प्रतिनिधी

उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दशसूत्री जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. “आमची सत्ता आल्यानंतर शहरातील नागरिकांना कोणत्या प्रमुख १० सोई-सुविधा देणार आहोत, हे स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. माझ्या सहकाऱ्यांना संधी द्या, हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही पराकाष्ठा करू,” अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली.

प्रा. शामराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, जेष्ठ नेते बी. ए. पाटील (बापू), माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, प्रदेश सदस्या कमल पाटील, प्राचार्य राजेंद्र कुरळपकर, शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. जयंतराव पाटील म्हणाले,

“शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक कोंडी— या सर्व मूलभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे. आम्ही प्रशासन पारदर्शी, लोकाभिमुख करत शहरातील मूलभूत सोयी-सुविधांची उभारणी करू. बेघरांच्या घरकुल योजना, शिक्षणाचा दर्जा, स्थानिक उद्योग, रोजगार, स्वच्छ-हरित शहर, महिलांचे व युवकांचे सक्षमीकरण यावर आम्ही लक्ष केंद्रित करू.शंकरराव चव्हाण, शैलेश पाटील, उमेश रायगांधी, दिग्विजय पाटील, राजू खरात, संजय खवळे, रविंद्र वाघमोडे, चंद्रकांत ताटे, सुनील माळी, मनोज करे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



“१९८५ ची पुनरावृत्ती… विक्रमी बहुमताची परिस्थिती” — प्रा. पाटील

प्रा. शामराव पाटील म्हणाले, “शहरातील नागरिकांच्या सूचनांवर आधारित वास्तववादी जाहीरनामा आम्ही दिला आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून १९८५ ची पुनरावृत्ती होणार आहे. आमचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील.”


३५ वर्षांची परंपरा खंडीत केली – शहाजी पाटील

शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले,“आम्ही गेल्या पाच वर्षांचे काम आणि पुढील पाच वर्षांची योजना लोकांसमोर ठेवली. मात्र विरोधकांनी २०१६ पासून ३५ वर्षांची परंपरा खंडीत केली. सत्ता नसतानाही आ. जयंतराव पाटील यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला.”

“आमच्या बाजूला श्रीकृष्ण… आम्ही निश्चित जिंकणार!”

राष्ट्रवादीचा श्रीकृष्ण आणि जंगम व गवळी समाजाची स्मशानभूमी।।महाभारतात पांडव संख्येने आणि साधनांनी कमी होते. मात्र त्यांच्या बाजूला श्रीकृष्ण असल्याने ते युद्ध जिंकले. तसे आमच्या बाजूला आ.जयंतराव पाटील असल्याने आम्ही निश्चित ही निवडणूक जिंकू. शहरातील जंगम व गवळी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेची पूर्तता केली असून सध्याच्या स्मशानभूमीच्या उत्तरेस ही जागा असल्याचेही त्यांनी सांगितले.

---

Post a Comment

0 Comments