प्रतिनिधी - गणेश ठाकरे लासलगाव
दि.11 डिसेंबर ते 17 डिसेंबर सप्ताह सिकलसेल जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो.या सप्ताहाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार जी पवार साहेब भा.प्र.से. यांनी व जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे साहेब यांनी सिकलसेल आजार जनजागृती निमित्त आवाहन करण्यात आलेले आहे.
या सप्ताहा चा जास्तीत जास्त रुग्ण तपासणी हा आजार कमी करण्याचे असल्याने सिकल सेल आजाराची लक्षणे आढळल्यास तपासणी करून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये तपासणी करून उपचार करावे. असे आवाहन श्री. मोरे यांनी केले.
व या सप्ताहाचे सर्वांनी सहभाग घेऊन सिकल सेल आजारावर मात करूया असे जाहीर आवाहन ओमकार पवार साहेब यांनी केले.

Post a Comment
0 Comments