Type Here to Get Search Results !

हिवरा संगम येथील स्त्री परिचर भरतीवरचा आक्षेप रद्द करा!योगीता हरणे



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी  विवेक नरवाडे 

महागांव तालुक्यातील हिवरा संगम येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अंशतकालीन स्त्री परिचर पदाच्या भरती प्रक्रियेत गंभीर आक्षेप घेण्यात आला होता.या भरती प्रक्रियेत मी स्वतःहा योगीता राजदीप हरणे अर्ज दाखल केला होता.परंतु या भरती प्रक्रियेत माझी निवड झाली नाही व सदर स्त्री परिचर भरती प्रक्रियेवर मी कुठल्याही प्रकारचा आक्षेप दाखल केले नाही मी काही दिवस बाहेरगावी असल्याने याचा फायदा घेत हिवरा संगम येथील ग्रा प माजी उपसरपंच शरद पाटील,व ग्रा प सदस्य राजु धोतरकर यांनी माझ्या नावाचा गैरवापर करून व माझी खोटी स्वाक्षरी मारुन समाजात व प्रसार माध्यमावर माझी व माझ्या पतीच्या नावाने बदनामी केली आहे.त्यामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर दिलेल्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसुन माझ्या नावाचा केवळ गैरवापर करन्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी माझा तिळ मात्रही आक्षेप नसुन सदर प्रकरण रद्द करून माझ्या नावाचा वापर करत खोट्या स्वाक्षरी करणाऱ्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती महागांव यांच्या कक्षात मी निवेदन सादर केले असून सदर दिलेल्या निवेदनानुसार तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी योगिता हरणे यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments