Type Here to Get Search Results !

शनि अमावस्या: माहूरगड कैलास टेकडीवर महागांवच्या अष्टविनायक मंडळाकडून भाविकांना महाप्रसाद!



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

माहूरगड: शनि अमावस्येचे औचित्य साधून माहूरगड येथील कैलास टेकडीवर महागावच्या अष्टविनायक गणेश मंडळा च्या वतीने भाविकांसाठी मसाले भात आणि थंड पाण्याचे विशेष नियोजन करण्यात आले होते. तीव्र उन्हात गडावर येणाऱ्या हजारो भाविकांना या थंड पाण्याचा आणि महाप्रसादाचा मोठा दिलासा मिळाला.

हा धार्मिक व सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील दादा गाडबैले, यज्ञेश गाडबैले, वैभव कोपरकर, गणेश पाटे, प्रथमेश गाडबैले, श्रेयेश गाडबैले, अंकुश पाटे, नैतिक बोडखे, स्वराज बोडखे, पृथ्वीराज गावंडे, ओमकार नरवाडे आदी युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळाच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.


Post a Comment

0 Comments