Type Here to Get Search Results !

श्री कौडेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्याचे आकर्षक जहाज मॉडेल



तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर येथील श्री कौडेश्वर विद्यालय, पिंपळगाव कौडा येथील इयत्ता नववीतील विद्यार्थी आयुष ज्ञानेश्वर पवार याने शालेय उपक्रमांतर्गत तयार केलेल्या आकर्षक व कलात्मक जहाजाच्या मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, कल्पकता व कौशल्य विकास घडावा, या उद्देशाने विद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याच उपक्रमांचा भाग म्हणून आयुष पवार याने स्वतःच्या मेहनतीने व कल्पकतेच्या जोरावर हे सुंदर जहाजाचे मॉडेल साकारले आहे.

या उपक्रमासाठी आयुषला विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार पोपट सर यांच्यासह दळवी शेषराव सर, पिंपळे भास्कर सर, झावरे शैला मॅडम, अंधळे बाळासाहेब सर व कोल्हे धोडिंभाऊ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आयुषने तयार केलेले हे जहाज मॉडेल पाहण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी मोठी उत्सुकता दर्शवली. त्याच्या या अभिनव व उपक्रमशील कार्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची आवड, वैज्ञानिक विचारसरणी व आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. 


Post a Comment

0 Comments