प्रतिनिधी:विकास नवगिरे (दावरवाडी)
दावरवाडी गावा लगत न्यू हायस्कूल शाळा आणि कॉलेज आहे गावातील मुख्य रस्त्यावर रात्रीतून अचानक भला मोठा गतिरोधक उभारल्या मुळे नागरिकांना रोड वर अचानक ब्रेक मारवा लागतो आहे आणि त्या मुळे अपघात ही होण्याची शक्यता आहे आज सकाळी सुमारे 6 वाजता क्लास ला येत असताना पार्थराज पोकळे (सालवडगाव) या विद्यार्थ्याचा गतिरोधक मुळे अतिशय भयानक अपघात झाला अचानक रात्री तून झालेल्या गतिरोधक लक्षात न आल्याने गतिरोधक ला गाडी आदळल्या मुळे विद्यार्थ्यांचे संतुलन बिघडून गाडी व विद्यार्थी 30 ते 35 फूट घसरत गेली त्या मध्ये त्याला गंभीर दुखापत झाली येन परीक्षा तोंडावर आलेल्या असताना त्याचा अपघात झाला गाडी खाली पडल्याने मोठा आवाज झाला गाडी चा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली आणि त्याला बघितले त्याला गंभीर दुखापत पाहून ग्रामस्थानी क्लास चे सर इसुफ सर यांना संपर्क केला असता सर वाऱ्याच्या वेगाने येऊन विद्यार्थ्याला तत्काळ दवाखान्यात हलवले
या वेळी ग्रामस्थ यांनी सांगितले की मोठा गतिरोधक करण्या ऐवजी छोटे छोटे 2 गतिरोधक थोड्या अंतरावर करायला हवे या मुळे अजून ही अपघात होण्याची शक्यता आहे .

Post a Comment
0 Comments