प्रतिनिधी - युवराज माने
सांगली जत - जत तालुक्यातील शेगाव पंचायत समिती गटातून शिंदेच्या शि्वसेनेतून चंद्रकांत शिंदे पिगमी ऐजेंट शेगाव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत चालला आहे
याच दुसर कारण म्हणजे भाजपच वाढतं वर्चस्व भाजपला शह देण्यासाठी एकनाथ ग्राऊंड लेव्हला काम करत आहेत त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता
सर्वसामान्य व्यक्तील सुद्धा एकनाथ शिंदे उमेदवारी देत आहेत सध्या शेगाव ग्रामपंचायतीवर भाजपजी सत्ता आहे त्यामुळे शिंदे शिवसेनेसाठी थोडसं कठीण काम असणार आहे एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सर्वसामान्य एका संस्थेत पिगमी ऐजेंट म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे शेगांव गावातील व इतर आसपास गावातील परिसरातील सर्वसामान्य जनतेची मने जिंकली आहेत चंद्रकांत शिंदे यांच्या बद्दल सांगायचे म्हंटले तर स्वभावाने शांत हुशार आणि प्रामाणिक अस एक व्यक्तीमत्व आहेत प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे अस एक त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य त्यांच्या पुढे दोन मोठ्या पक्षांची आव्हाने आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसर काॅंग्रेस यातून चंद्रकांत शिंदे कसे शिवसेनेला नव्याने उभारी देतात हे पाहावं लागणार आहे

Post a Comment
0 Comments