Type Here to Get Search Results !

जिल्हा विधी सल्लागार प्रमुख पदी - ॲड. श्याम भलगे



प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी

रिपब्लिकन युवा सेना जिल्हा संपर्क कार्यालय उमरखेड येथे पक्ष प्रवेश पार पडला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना भीमराव खंदारे यांनी केली तर सूत्रसंचालन शहर अध्यक्ष शुद्धोधन भाऊ दिवेकर यांनी केले.राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणूकिचे बिगुल वाजले असून, त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेच्या पंचायत समिती - जिल्हा परिषद गण निहाय बांधणीला वेग आला असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेची लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने सत्तेत जाण्याचा राजमार्ग आनंदराज आंबेडकर यांनी युतीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांना मोकळा करून दिला असून आपण सत्तेचे वाटेकरी व्हायलाच हवे असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी केले.

यावेळी ॲड. श्याम भलगे यांची यवतमाळ जिल्हा विधी सल्लागार प्रमुख पदी तर बबनराव वाहुळे यांची पोफाळी सर्कल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. रामदास काळे यांची उमरखेड तालुका कामगार आघाडी प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली तसेच शंकरराव हिंगमिरे यांची उमरखेड शहर सदस्य पदी तर बाळासाहेब जिल्हावार यांची महात्मा फुले वॉर्ड शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली तर अनेक युवकांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला.

यावेळी जिल्हा कार्यालय संपर्क प्रमुख व्यंकटेश वाघाडे, ता. उपाध्यक्ष राजू आगीरे व स्थानिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.

Post a Comment

0 Comments