श्रीराम सेवा प्रतिष्ठान, विजयनगर (भवानीनगर) व ग्रामस्थ यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भवानीनगर: विजयनगर येथे रेवनील ब्लड सेंटर, सांगोला यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून युवकांनी स्वेच्छेने पुढाकार घेतल्याने शिबिराला विशेष यश प्राप्त झाले.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, या भावनेतून अनेकांनी रक्तदान केले. या उपक्रमामुळे समाजात सेवाभाव व सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली.
शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास पाण्याची बाटली व प्रशस्तीपत्र (प्रमाणपत्र) देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
0 Comments