यासाठी अभियंता गणेश आंधळे, महेश साठे व तुकाराम कातोरे यांनी कृषी विभागाकडे निवेदन सादर करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत मंडळ अधिकारी रावळ मॅडम यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला आहे.त्यामुळे पिंपरी नाल्याच्या दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कामामुळे परिसरातील पाणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी संतोष आंधळे, प्रा. मारुतराव आंधळे, ऋषिकेश आंधळे, दादा साठे आदी उपस्थित होते. दरम्यान, मा. सरपंच तुकाराम कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.दरम्यान, प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments