Type Here to Get Search Results !

नेट सेट ग्रस्त प्राध्यापकांचा राज्यस्तरीय मेळावा यशस्वी

 



  प्रतिनिधी  - गोपाळकुमार कळसकर 

भुसावळ :  आज  १ मार्च  रोजी दुपारी एक वाजता नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे  नियोजित नेट सेट ग्रस्त प्राध्यापकांचा राज्यस्तरीय मेळावा यशस्वी झाला. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या मेळाव्यास, जळगाव, धुळे, व्यतिरिक्त नाशिक,चंद्रपूर, गडचिरोली,बुलढाणा, अलिबाग, येवला, शिरपूर, शहादा, नंदुरबार, येथील प्राध्यापक हजर होते. सर्वप्रथम प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गोविंद काळे सर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.  प्रा.डॉ.गोविंद काळे सरांच्या  हस्ते  दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात  आले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात प्रा. डॉ. गुणवंत सोनवणे, डॉ संजय भदाणे, डॉ नितीन बारी, डॉ पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा. डॉ. गोविंद काळे सर यांनी नेट सेट चा संपूर्ण इतिहास मांडला.अतिशय महत्वपूर्ण असे आशादायक असे महत्वाचे मुद्दे मांडले. प्रा डॉ गोविंद काळे सर यांनी यावेळी विविध  मुद्यांवर प्रकाश टाकला. यामध्ये १) प्रा आशा रामदास बिडकर व इतर प्राध्यापक यांना जो इंटरिम रिलीफ मिळाला आहे त्याला अनुसरून  जर नेट सेट पास प्राध्यापक संघटना व प्राध्यापक संघटना यांनी याचिका दखल करण्याची घाई केली नसती तर अंतिम निकाल सन २०२३ मध्येच लागला असता. २) ज्या प्रकारे प्रा आशा रामदास बिडकर व इतर प्राध्यापक यांचे अप्रोव्हल विद्यापीठाकडून बदल करण्यात आले आहे तसे इतर प्राध्यापक यांचे अप्रोव्हल विद्यापीठाकडून बदल करण्यात आले आहे का?  ३) बॉम्बे हाय कोर्टात ट्रिपल बेंच समोर सर्व काही असतांना संघटना केस का हारली? ४) प्रा आशा रामदास बिडकर व इतर प्राध्यापक यांच्या याचिकेत विद्यापीठाकडून शपथपत्र दाखल करण्यात आले आहे असे किती विद्यापीठांकडून शपथपत्र दाखल करण्यात आले  आहे? असे विविध मुद्दे चर्चिले गेले.या ठिकाणी आलेला  प्राध्यापकवर्ग  जातांना समाधानी होता. त्यांनी मेळाव्यास  येण्यासाठी जी मेहनत घेतली होती ती सत्कारणी लागली असे प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.अनिल हरी शिंदे तर आभार प्रदर्शन डॉ. सौ माधुरी सतीश पाटील यांनी केले. प्रा. डॉ. गोविंद काळे सर यांचे सर्वांच्या वतीने  आभार व्यक्त करण्यात आले. प्रा. डॉ. बिपीन शिंदे, प्रा. डॉ. एन एस कदम तसेच मुख्य याचिकेतील  प्राध्यापक यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमात नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डॉ. एल पी देशमुख यांनी पाठविलेली छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची डायरी उपप्राचार्य डॉ. के बी पाटील,उपप्राचार्य डॉ सौ माधुरी सतीश पाटील, प्रा आर बी देशमुख यांच्या हस्ते भेट म्हणून  मान्यवरांना देण्यात आली. शेवटी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुंदर प्रांगणात सामूहिक फोटोसेशन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments