Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंत राजाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी



*प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी

विडूळ येथे संत राजाराम महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली अतिशय वातावरणामध्ये ही जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला असंख्य कैकाडी समाज उपस्थित होता या कार्यक्रमांमध्ये मंगेश भाऊ जाधव मित्र मंडळ प्रथमता संत कैकाडी महाराजांचे पूजन करण्यात आले व त्यानंतर राष्ट्रसंत राजाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला संत राजाराम महाराज जाधव हे पंढरपूरचे महान वारकरी संत आणि समाज सुधारक होते ज्यांनी माणसं व्हा हा मोलाचा संदेश दिला त्यांनी पंढरपुरात कैकाडी महाराज मठ स्थापन करून वारकरी संप्रदायाचा प्रसार केला तसेच अंधश्रद्धा व जातीभेदाचा निर्मूलनासाठी भजनाचा वापर केला .

त्यांचे मूळ नाव राजाराम भागुजी जाधव होते आणि जन्म 1907 मध्ये नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडव गण गावात झाला त्यांनी आयुष्यभर माणूस सेवा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार केला तुम्ही देव होऊ नका तुम्ही संत होऊ नका तुम्ही फक्त माणसं व्हा माणसं हा त्यांनी समाजाला महत्त्वाचा संदेश दिला त्यांनी पंढरपूर येथे श्री संत कैकाडी महाराज मठ स्थापन केला जो आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचे केंद्र बनला अखेर 21 ऑक्टोबर 1978 रोजी पंढरपुरात त्यांनी देह ठेवला त्यांच्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते . या कार्यक्रमांमध्ये मंगेश भाऊ जाधव. व राजू गायकवाड. यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची केला या कार्यक्रमाला पोलीस स्टेशनची पीएसआय विनायक रामोड. जमादार चव्हाण. गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंजाबराव भालेराव. पोलीस पाटील गजानन मुलगे. इत्यादी उपस्थित होते व तसेच गावातील महिला व पुरुष कैकाडी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments