Type Here to Get Search Results !

उमरखेड तालुक्यात रेती माफीया यांचा सुळसुळाट



..

 
महसूल व पोलिस प्रशासनाची मिली भगतउमरखेड उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय दलित कोब्रा व अखिल भारतीय संघ यांचे आमरण उपोषणाला सुरुवात  घरकुल लाभार्थ्यांचे रेती विना बेहाल.


प्रवीण कुंटे उमरखेड प्रतिनिधी.

उमरखेड तालुक्यामध्ये बरेच रेती घाट शासनाने हरास केलेले आहे परंतु रेतीवाले हरास झालेल्या घाट तसाच ठेवून दुसरीकडूनच जेसीबीने व विशिष्ट प्रकारच्या बोटने रेती  उपसा करीत आहेत.व मोठमोठे रेतीचे साठे करीत आहेत तसेच एकाच रॉयल्टी पावतीवर २४ घंटे रेती ओढत आहेत परंतु घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या  नियमाप्रमाणे   रेती देत नाही.शासनाने नियम काढला की घरकुल लाभार्थ्यांना रेती ग्रामपंचायत च्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे. 

परंतु घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नाही फक्त कागदपत्राची अंमलबजावणी होत आहे. हराशी झालेली रेती घाटावर महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही रेतीपेंडावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. ते बसविण्यात यावे. व प्रत्येक दोन घंट्यांनी सीसीटीव्ही फुटेज महसूल विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात यावे. व उमरखेड तालुक्यात बऱ्याच रेती घाटावर अवैध्य रेती उपसा होत आहे याची चौकशी वरिष्ठ पातळी करण्यात यावी. 

रेती माफीया  हे  गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास आम्हाला कोणत्या खोट्या गुन्ह्यात बसवल्यास याची संपूर्ण जबाबदारी रेती माफिया व शासनावर राहिल.



Post a Comment

0 Comments