Type Here to Get Search Results !

एकाच मंडळावर सर्व विभाग” : नागरिकांच्या तक्रारींना त्वरित दिलासा देण्यासाठी विशेष शिबिर



महागांव प्रतिनिधी : विवेक नरवाडेदवंडी वार्तापत्र 

नागरिकांच्या विविध शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी व्हावी आणि त्यांच्या तक्रारींना त्वरित मार्ग मिळावा, या उद्देशाने तहसील कार्यालयांतर्गत सर्व विभागांना एकत्र आणून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महागाव येथे ५ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

या अभियानांतर्गत तहसील कार्यालयाशी संबंधित विविध विभागइलेक्शन, संजय गांधी निराधार योजना, सर्टिफिकेट विभाग तसेच सातबारा संदर्भातील प्रश्न—एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व अर्ज स्वीकारून त्यांचे त्वरित निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. यापूर्वीही अशा उपक्रमांतून हजारो अर्जांचे संकलन करण्यात आले असून यंदाही शिबिराच्या दिवशी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या काही तक्रारी किंवा अडचणी असल्यास त्या या शिबिराच्या माध्यमातून मांडाव्यात. स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच विविध सोशल मीडिया गटांच्या माध्यमातून या शिबिराची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनीही पुढे येऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

या शिबिरात महसूल विभागासोबतच कृषी विभागही सहभागी होणार आहे. कृषी विभागाच्या विविध योजना फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण इत्यादींबाबत शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच घरकुल संदर्भातील प्रलंबित प्रकरणे, निधी न मिळाल्याच्या तक्रारी, नवीन लाभ तसेच अतिक्रमण घरकुलाविषयी माहिती नियमांबाबतच्या समस्या यावरही मार्गदर्शन व कार्यवाही केली जाणार आहे.

प्रशासनाकडून विविध गावांमध्ये शिबिरांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार हिवरा येथे ७ मार्च २०१९, कासोळा येथे १ एप्रिल २०२६, मुरत येथे १७ एप्रिल २०१६, काळी दौलत येथे १४ मार्च २०१६, एप्रिल गुंज येथे १५ मे २०२४, फुलसंगी येथे ८ मे २०१९ व १५ मे २०१९ अशा ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, महागांवचे तहसीलदार अभय मस्के तसेच महागांव तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments