प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डिलर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार निफाड तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर निफाड तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने पंचायत समिती कृषी अधिकारी मोगल, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार तसेच तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर वाढत चाललेला प्रशासकीय ताण, कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धत, अनधिकृत एजंटमार्फत होणारी विक्री, तसेच खत व कीटकनाशक विक्रीवरील कडक नियम याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी दुकानदारांना जबाबदार धरणे थांबवावे, अनधिकृत बीटी बियाण्यांच्या विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब माधवराव जाधव, उपाध्यक्ष रामभाऊ यशवंतराव माळोदे, सरचिटणीस जयवंत सुखदेव कापसे, सहसरचिटणीस प्रल्हाद संपतराव खडांगळे, खजिनदार ईश्वर रामभाऊ जाधव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, तालुक्यातील विक्रेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बेमुदत बंद आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments