Type Here to Get Search Results !

महागांवात दुहेरी खेळ उघड; पत्रकार परिषदेत प्रश्नांचा भडिमार! दारूभट्टीला एनओसी, घरकुलात गोंधळ, स्ट्रीट लाईट बंद – प्रशासनावर गंभीर आरोप



दवंडी वार्तापत्र महागांव  प्रतिनिधी – विवेक  नरवाडे

महागांव :

महागाव नगरपंचायतीत अलीकडे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून, हे सगळं जनतेसाठी की फक्त वैयक्तिक प्रचारासाठी? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. दारूभट्टी, घरकुल योजना आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.


घरकुलावरून प्रचार की काम?– नागरिकांचा थेट सवाल

घरकुल योजनेवर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


घरकुलासाठी २५ हजार रुपये देऊन माहिती घेतली, मग कारवाई का नाही?


गरजूंना घर मिळणार की फक्त आश्वासन?


अशा प्रश्नांनी वातावरण तापले आहे. अनेक लाभार्थ्यांची अद्याप कोणतीही प्रत्यक्ष घरकुल अनुदान न मिळाल्याची तक्रार केली आहे.


स्ट्रीट लाईट अजूनही अंधारात!

शहरात स्ट्रीट लाईट बसवण्याच्या घोषणा केल्या गेल्या, मात्र


अनेक ठिकाणी अजूनही लाईट बसवले गेले नाहीत


 नागरिक अंधारातच वावरत आहेत


मूलभूत सुविधांमध्येच अशी परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दारूभट्टीला आधीच एनओसी; विजेच्या मीटरलाही परवानगी

या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे –


दारूभट्टी सुरू करण्यासाठी आधीच ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले


त्या ठिकाणी विजेचा मीटर बसवण्यासाठीही परवानगी देण्यात आली


यामुळे आता थेट प्रश्न विचारला जात आहे –


हे सर्व कोणाच्या कृपेने झाले?


आता विरोधही त्यांचाच… आणि पाठिंबाही त्यांचाच?


प्रभागात अशी जोरदार चर्चा सुरू आहे की,


 जे लोक आधी परवानगी देत होते


 तेच आता दारूबंदीच्या नावाखाली विरोध करत आहेत


 वरवर विरोध… आतून पाठिंबा!


या दुहेरी भूमिकेमुळे 

नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे.

2022 पासून सुरू दारूभट्टीचा खेळ


स्थानिकांच्या मते,


 2022 पासूनच या दारूभट्टीच्या प्रक्रियेचा खेळ सुरू आहे


 टप्प्याटप्प्याने सर्व परवानग्या दिल्या गेल्या


आता मतदानाच्या नावाखाली वेगळाच नाट्य रंगवले जात आहे

बाटली उभी होण्याची शक्यता – चर्चांना उधाण


आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर


 दारूभट्टी सुरू राहण्याची (बाटली उभी होण्याची) दाट शक्यता वर्तवली जात आहे


मतदानावर प्रभाव 


टाकण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा आरोप

यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशयाची छाया पडली आहे.

नागरिकांचा संताप उफाळला

महागांवात आता एकच चर्चा 


जनतेला मूर्ख समजलं आहे का?


आधी परवानगी, मग विरोध – हा कोणता खेळ?


घरकुल, लाईट, पाणी सोडा… दारूभट्टीला मात्र वेग!


 हा खेळ थांबवाच!

महागांवात सध्या सुरू असलेली परिस्थिती ही केवळ प्रशासनातील गोंधळ नाही, तर जनतेच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे.


 घरकुल प्रलंबित


 स्ट्रीट लाईट बंद


आणि दारूभट्टीला ग्रीन सिग्नल

ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.


शेवटचा सवाल…

 महागांवात विकास होतोय की फक्त नाट्यमय राजकारण?

जनतेची एकच मागणी — सत्य बाहेर येऊन, दोषींवर कारवाई करा आणि दुहेरी खेळ थांबवा!


Tags

Post a Comment

0 Comments