Type Here to Get Search Results !

सामाजिक विषयांवर आवाज उठवणाऱ्या विठ्ठल कांगणे सरांचे इन्स्टाग्राम अकाउंट बॅन #BringBackKanganeSir मोहीम जोरात; अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असल्याचा आरोप



दवंडी वार्तापत्र प्रतिनिधी महागांव  विवेक नरवाडे 

महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर परखडपणे मते मांडणारे विठ्ठल कांगणे सर यांचे Instagram (vitthal_kangne) अकाउंट अचानक बॅन करण्यात आल्याची घटना समोर आली असून, यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. भोंदू बाबांविरोधात आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यांवर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच ही कारवाई झाल्याचा आरोप समर्थकांकडून करण्यात येत आहे.

एक व्हिडिओ… आणि अकाउंट बंद!

मिळालेल्या माहितीनुसार, कांगणे सरांनी अलीकडेच काही संवेदनशील सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओनंतर काही तासांतच त्यांचे अकाउंट बंद झाल्याचे समोर आले.यामुळे एक व्हिडिओ… आणि अकाउंट बंद अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर अनेकांनी ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे म्हटले आहे.सत्य बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे का?”असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही समर्थकांनी तर थेट आरोप करत म्हटले की,

भोंदू बाबांविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात असेल, तर यामागे मोठे राजकीय व सामाजिक हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोहीम ट्रेंडमध्ये

कांगणे सरांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांसह नेटिझन्स मोठ्या प्रमाणावर पुढे आले आहेत.#BringBackKanganeSir हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत असून, अकाउंट पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.


अनेकांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे —

अकाउंट बॅन करू शकता, पण आवाज नाही!

आम्ही विठ्ठल कांगणे सरांसोबत आहोत!

विद्यार्थ्यांचा संताप; शिक्षकाला पाठिंबा


स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक असलेल्या कांगणे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने काम केले आहे.त्यामुळे त्यांच्या अकाउंटवर कारवाई झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की,

सर नेहमी समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवतात. त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही.

कांगणे सरांची भूमिका ठाम

दरम्यान, कांगणे सरांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की,अकाउंट बंद झाले तरी माझा आवाज थांबणार नाही. समाजातील अन्यायाविरोधात मी बोलत राहणार.त्यांच्या या भूमिकेमुळे समर्थकांमध्ये अधिकच उत्साह निर्माण झाला आहे.

सध्या अकाउंट गायब; प्रश्न अनुत्तरित

सध्या कांगणे सरांचे इन्स्टाग्राम अकाउंट पूर्णपणे बंद असून, ते सर्चमध्येही दिसत नाही.अकाउंट नेमके कोणत्या कारणामुळे आणि कोणाच्या तक्रारीवरून बॅन करण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


 भूमिका : आवाज दाबला की आंदोलन वाढते

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा विचार मांडण्याचा महत्त्वाचा मंच बनला आहे. अशा वेळी कोणाचे अकाउंट अचानक बंद होणे ही गंभीर बाब मानली जाते.

जर ही कारवाई चुकीच्या पद्धतीने झाली असेल, तर संबंधित प्लॅटफॉर्मने पारदर्शकता ठेवून स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. अन्यथा आवाज दाबण्याचा प्रयत्न” अशी भावना अधिक बळावण्याची शक्यता आहे.


शेवटचा सवाल…


भोंदूपणाविरोधात बोलणं गुन्हा आहे का?

सत्य मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जाणार का?

सध्या एकच मागणी जोर धरत आहे —

विठ्ठल कांगणे सरांचे अकाउंट तात्काळ सुरू करा!आता या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments