ईश्वरपूर / प्रतिनिधी
येथील माणुसकीचं नातं प्रतिष्ठानने महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरामध्ये ४७५ जणांनी रक्तदान केले. राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, उद्योजक संतोष पाटील, उद्योजक सर्जेराव यादव, वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव अॅड.धैर्यशील पाटील, डॉ. प्रदीप शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.के.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक पोलीस उप आयुक्त कृष्णात पिंगळे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी स्वागत केले. उद्योजक दीपक कोठावळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश कुरळपकर, सचिव प्रा.डॉ.महेश जोशी, खजिनदार गौतम रायगांधी,सतीश सूर्यवंशी, विकास राजमाने, पोलीस उपनिरीक्षक संपत वारके, शुभम यादव, अमित यादव,डॉ.उमेश जाधव, प्रा.डॉ.जी के.किर्दत, विक्रम सावंत तसेच जायंट्स ग्रुप, इस्लामपूर व्यायाम मंडळ,मॉर्निंग गार्डन ग्रुप व सहकारी आदीनी संयोजन केले. याप्रसंगी प्रतिष्ठानला सहाय्यक करणा-या लालासाहेब गुरव यांच्यासह विक्रमी रक्तदान केलेल्या गजानन परब,पत्रकार विनोद मोहिते, पत्रकार निवास पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
राजारामबापू रक्तपेढी यांच्यासह हिंदरत्न प्रकाश बापू सांगली, वसंतदादा ब्लड बँक मिरज, महात्मा गांधी ब्लड बँक पारगाव, मिरज सिरालॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक या रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments