खंडाळा प्रतिनिधी:आनंद भारमल
आळंदी - येथे सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा राज्यस्तरीय काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष गीतकार सिने अभिनेते लोककवी सिताराम नरके ( राष्ट्रपती पदक पोलीस मानकरी ) उद्घाटक मा प्रमोद वाघ वरिष्ठ पोलीस निरीक्षक (दिघी पोलीस स्टेशन )प्रमुख पाहुणे अनिल गुंजाळ (अभिनेते )ज्येष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रशांत चव्हाण डॉ ओमकार चव्हाण (उपाध्यक्ष )जयश्री सोनवणे (सचिव ) द्रोपदा सोनवणे (खजिनदार ) यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व राष्ट्रीय ग्रंथ संविधान यांचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव एडवोकेट जयश्री सोनवणे यांनी केले संस्थेचे विविध उपक्रम सामाजिक सेवेत सहभाग संघर्षातून प्रगतीकडे अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे आरोग्य शिबिर भरवणे शैक्षणिक आरोग्य सवलती मिळवून देणे असे अनेक उपक्रम संस्था राबवते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते समाज प्रबोधनाची कास हाच आमचा ध्यास महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांना विचारपीठ मिळून देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत पुस्तक प्रकाशन नृत्य कला स्पर्धा महिलांसाठी विविध उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो असे त्यांनी सांगितले
उद्घाटन प्रसंगी प्रशांत वाघ साहेब म्हणाले कवींचे विविध विषय नेहमीच असतात पण चालू घडामोडीवर जनजागृती झाली पाहिजे अत्याचार भ्रष्टाचार क्राईम अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी साहित्यिकांनी लिहिते झालं पाहिजे असे परखड लिहिले तर समाजात प्रबोधन होईल बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपल्या सगळ्यांना समान अधिकार मिळाला असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोककवी सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी म्हणाले आई बापांची सेवा करणे तोच खरा या जगात भाग्यवंत आहे वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ या कवितेने सर्वांना भाऊ केले गैरवर्तन सोडून या देशात परिवर्तन झाले पाहिजे असे त्यांनी सांगितलेया पहिल्या सत्रात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मानपत्र शाल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह असे पुरस्कार स्वरूप होतेअक्षय बाबासाहेब जाधव.
"बेस्ट DJ 'लाइव्ह इव्हेंटॲक्ट'अवॉर्ड्स2026"सौहेमलता प्रदीप गिते.*साहित्यरत्न पुरस्कार*श्री.रामभाऊ नारायण लगाडे"समाजरत्न पुरस्कार श्री.पै.नाना किसनराव डोंगरे"समाजरत्न पुरस्कार" सौ.विजया विजयसिंह पाटील उत्कृष्ट चरित्र लेखिका"पुरस्कार सौ.सोनाली रमण बिरादार नारीरत्न पुरस्कार"अशोक कुंडलिक भालके जीवन रक्षक पुरस्कार या उद्घाटन पुरस्कर वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन गजानन उफाडे यांनी केलेया सर्व मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले
या उद्घाटन पुरस्कर वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन गजानन उफाडे यांनी केले दुसऱ्या सत्रामध्ये मध्ये निमंत्रित कवींची काव्य मिळतील आयोजित केली होती त्या काव्य मैफिलीचे अध्यक्ष रज्जाक शेख हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी आनंदा भारमल,आनंदा साळवे,गजानन उफाडे हे उपस्थित होते निवृत्ती कानवडे रमेश चव्हाण उमेश गोरे अनिस मुलाणी सतीश कांबळे रेखा दुसाने अरुण घोडके सुनीता घोडके गझलकारा अमिरुनिसा शहा नंदकिशोर गावडे महादेव लांडगे माधुरी इंगळे करुणा शिंदे किशोर मोगल दशरथ दुनघव जनाबापू पुणेकर छगन वाघचौरे कार्तिक झेंडे अनिल केंगार शैला गावंडे अर्चना सबनीस धनश्री ताठे यांनी आपल्या भारदार रचना सादर करून रसिकांची मनी जिंकली या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार शैलीत रंगतदार काव्य मेथी केली हा कार्यक्रम आळंदी रोड येथील बालाजी मंदिरा जवळ असलेले अशोका बँकेट हॉल येथे संपन्न झाला

Post a Comment
0 Comments