दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनराज निळे. व उपनिरीक्षक अमोल राठोड यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संवेदनशीलतेने महागांव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा आदर्श पॅटर्न निर्माण करणारे पोलीस निरीक्षक धनराज निळे व उपनिरीक्षक अमोल राठोड यांचा नुकताच निरोप समारंभ दिनांक. ७/६/२०२६रोजी शकूराज मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
निळे साहेब यांची कळंब तालुका जिल्हा यवतमाळ येथे बदली तर . महागाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल राठोड यांची स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (कॅम्प) पुसद येथे एल.सी.बी पथकात एन्ट्री झाली
ठाणेदार धनराज निळे साहेब व उपनिरीक्षक अमोल राठोड साहेब यांनी महागाव पोलीस स्टेशन हद्दीत वर्दीच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीला वचक तर बसवलाच, पण सोबतच 'पोलीस आणि जनता' यांच्यातील समन्वय साधून एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताना, निळे साहेबांनी व अमोल राठोड साहेब यांनी नेहमीच माध्यमांना सकारात्मक आणि मोलाचे सहकार्य केले.
या निरोप समारंभाप्रसंगी महागाव तालुक्यातील प्रत्येक पत्रकार संघटना होमगार्ड पथक. नगरपंचायत अधिकारी. महसूल अधिकारी. व तसेच आजी माझी पदाधिकाऱ्यांनी धनराज निळे साहेब व अमोल राठोड साहेब यांना त्यांच्या भावी वाटचालीस आणि पुढील उज्वल कारकीर्दीस भरभरून फुलगुच्छ शाल श्रीफळ देऊन निरोप दिला व भरभरून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. हनुमंत गायकवाड साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड. मा. श्री. अमोल राठोड पोलीस उपनिरीक्षक महागांव.
मान्यवर. उपस्थिती म्हणून श्री संभाजी दादा नरवाडे साहेब. वनमाला ताई राठोड. लोकमतप्रतिनिधी संजय भगत लोक चिंतनचे संपादक गजानन वाघमारे एकता पत्रकार संघ महागावचे समन्वयक संजय भाऊ नागरगोजे. प्रतीक पाटील नरवाडे रुपेश देशमुख. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ.संदीप शिंदे पंजाबराव देशमुख खडकेकर. विजयराव खडसे. प्रमोद भरवाडे. सुजित ठाकूर विजय सूर्यवंशी. गुरुवर्य तानाजी बापू यांची उपस्थिती. महागाव पोलीस स्टेशनचे राईट हॅन्ड वसीम शेख.महागाव बीट जमादार गजानन येडतकर. सर्वांच्या उपस्थितीत हा
निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment
0 Comments