Type Here to Get Search Results !

इजनी ते पुसद बस सेवा सुरु:नागरिकांमधून समाधान व्यक्त!



महागांव:

तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या इजनी गावात गेल्या अनेक वर्षांपासून बस सेवा बंदच होती.त्यामुळे येथील नागरिकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता.आठवडी बाजार सह अनेक शासकीय कामानिमीत्त येथील वयोवृध्द नागरिकांसह महिला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करुन तास न तास खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत राहव लागत होते मात्र आता येथील नागरिकांची हि प्रतीक्षा समाप्त झाली असून थेट इजनी ते पुसद बस सेवा सुरु करण्यात आली आहे.येथिल ग्रा पंचायत सदस्य बिपीन पवार यांनी वारंवार पुसद आगारामधील शाखा व्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अखेर इजनी ते पुसद बस सेवा सुरु करण्यात आली आहे दिनांक ७ जुलै रोजी हि बस सेवा इजनी गावात धाव घेतल्याने येथील नागरिकांमधून बस चालक अशोक जाधव व वाहक राजु इंगोले यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी इजनी येथील बिपीन पवार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments