*प्रवीण कुंटे उमरखेड प्रतिनिधि
रिपब्लिकन सेना उमरखेड, संपर्क कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद मेळावा व नूतन पदाधिकारी यांचा नियुक्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रम रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर हिंगोली लोकसभा अध्यक्ष राजूभाऊ इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर
कार्यक्रमास यवतमाळ–वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख संतोष ठमके, रमेश इंगोले व अनिल राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
संपूर्ण राज्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने 'संघटन सृजन मोहीम' राबवली जात असून त्या माध्यमातून एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्त्यांना लोकसभा तसेच विधानसभा निहाय नियुक्ती देऊन त्यांच्यापुढे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षाचे सक्षम उमेदवार शोधणे आणि पक्षांची मतपेढी मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना पक्ष - संघटन पुनर्बांधणीचे विशेष अधिकार देण्यात येत आहेत.
हिंगोली लोकसभा अध्यक्ष राजूभाऊ इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांना होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच संघटनवाढी संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू इटकरे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना राजू आगिरे यांनी केली.
यावेळी संपर्क कार्यालय प्रमुख व्यंकटेश वाघाडे, तालुका उपाध्यक्ष राजू आगीरे, भीमराव खंदारे, शहर संघटक नंदू इटकरे, तालुका संघटक संदीप राऊत, बिटरगाव शाखाप्रमुख सुरेश लोमटे, चिंचोली शाखा सदस्य उत्तम सूर्य, ता. संपर्कप्रमुख गजानन गिरी, संजय सोनूने, गजानन भोयर, माधव भोयर, सखाराम राकडे, संस्कार दिवेकर, सिद्धांत दिवेकर, अभि खिल्लारे

Post a Comment
0 Comments