दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
सदर लघुपटचे चित्रीकरण सुभारंभ नुकताच विश्राम गृह येथे मा. परागभाऊ पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले या सुभारंभला गजानन डोमाले योगेश वर्मा, पुरुषोत्तम टिचूकले पुरुषोत्तम राठोड गजानन राठोड इत्यादी पाहुण्यांची उपस्थिती लाभली
8 वी ते 12 वी पर्यंत दिल्या जाणाऱ्या कॉलरशिप या अत्यंत महत्वाचा विषय घेऊन अकोट येथील शिक्षक रवींद्र आपोतिकर यांनी नव्या nmms या लघुपटच्या चित्रीकरणास सुरुवात केलेली आहे.
चित्रपटाचे निर्माते /कथा /पटकथा /संवाद रविंद्र आपोतिकर यांची असून यात मुख्य भूमिकेत वंशिका उभाड, जनार्धन राठोड, सिमा सपकाळ,जयप्रकाश तिजारे, रवींद्र वीरकर,प्रतिभा पवार, सचिन शेळके, नितीन ठाकरे, संजय उईके, बादल राठोड,सुरज सुधाकर पवार, प्रा.डॉ. संजय हर्षे साहेब इत्यादिची मुख्य भूमिका असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळेल, या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन वंदेकर यांनी केले.निर्मिती साहाय्य अल्का चिंचोळकर यांचे असून मेकअप यश चिंचोळकर यांनी पूर्ण केले.
विद्यार्थ्यांन मध्ये कॉलरशिप परीक्षे बद्दल उत्साह वाढावा आणि शिक्षणाची जिद्द वाढावी या साठी अत्यंत महत्वाचा विषय लोकांन पर्यंत पोहोचवा या करिता रवींद्र आपोतिकर यांनी या विषयावर चित्रपट निर्माण व्हावा आणि प्रत्येक शाळेत तो दाखविल्या जावा असे मधमांशी संवाद साधले.

Post a Comment
0 Comments