दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव, दि. — राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत महागाव शहर व गावातील सर्व पात्र मतदारांनी दि. 20 जुलै 2026 पर्यंत ई.एफ. (Enumeration Form) भरून संबंधित बीएलओ (BLO) यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन शैलेश कोपरकर, नगरसेवक तथा अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, महागाव यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी सांगितले की, मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे. सदर ई.एफ. फॉर्म बीएलओमार्फत घरपोच उपलब्ध करून दिले जात असून नागरिकांनी कोणताही विलंब न करता फॉर्म भरून द्यावा.
फॉर्म भरताना पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (दोन्ही कान स्पष्ट दिसतील असा), आधार क्रमांक, आई-वडिलांच्या मतदार ओळखपत्राचे (EPIC) क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक तयार ठेवावेत, असेही त्यांनी नमूद केले.
श्री. कोपरकर यांनी पुढे सांगितले की, 20 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून सर्व पात्र मतदारांनी त्यापूर्वीच फॉर्म भरून संबंधित बीएलओकडे जमा करावेत. मतदारांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याबाबत अधिक माहितीसाठी आपल्या परिसरातील बीएलओ किंवा संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही शैलेश कोपरकर, नगरसेवक तथा अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, महागाव यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments