प्रवीण कुंटे उमरखेड तालुका प्रतिनिधि
कासोळा : श्री क्षेत्र महाकाली संस्थान, श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम येथे समर्थ सद्गुरु श्री गजानंद माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनाग यज्ञ या धार्मिक व सामाजिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या नवनाग महायज्ञामध्ये १०२ प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची आहुती देण्यात आली. विविध प्रकारचे दोष, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, आरोग्य विषयक व मानसिक त्रास तसेच विविध शांती-विधींसाठी हा महायज्ञ करण्यात आला. नवनाग महायज्ञ समर्थ सद्गुरु श्री गजानंद माऊली यांनी संपूर्ण अनुष्ठान, महायज्ञ नवनाग पूजन विधिवत शास्त्रोक पद्धतीने संपन्न केले. (प्रति.)

Post a Comment
0 Comments