Type Here to Get Search Results !

माळवागद रस्त्याचे काम कधी पुर्ण होणार?मोहन चव्हाण!



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

तालुक्यातील पुसद मतदार संघामधील डोंगराळ भागात वसलेल्या माळवागद येथील रस्त्याची अतीशय दयनीय अवस्था झाली असुन याकडे सततच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या मार्गावर काल दिनांक २८ जुलै रोजी पुसद बस डोपोची एसटी बस प्रवाशांना घेऊन जात असतांना रस्त्यावर साचलेल्या चिखल पाण्यामुळे एसटी बसचे पुढील दोन्ही चके चिखलात फसल्याने या बस मधील प्रवाशी काही वेळेसाठी अडकुण बसले होते जसे तसे गावकऱ्यांच्या मदतीने हि बस चिखलाच्या बाहेर काढण्यात आली असून या बसने पुढील मार्गावर प्रस्थान केले.हि दयनीय अवस्था माळवागद रस्त्याची झाली असून प्रशासन कुंभकर्णासारक्या गाड निद्रेत झोपले की काय असा प्रश्न माळवागद येथील माजी सरपंच तथा सचिव मोहन चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.वांरवार शासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लेखी निवेदने दिलीत मात्र "खाया पीया कुछ नहीं! ग्लास तोडा बाराना"अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे पावसाळ्यात वारंवार या चिखलमय रस्त्यावर अनेक घटना घडत असुन या रस्त्यावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे करीता या मतदार संघातील संबंधित आमदार खासदारांनी व प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करुन वाहतुकीसाठी सुरक्षित बनवावे अशी जोरदार मागणी येथील सचिव तथा खरिदी विक्री संघाचे माजी संचालक मोहन चव्हाण यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments