Type Here to Get Search Results !

वाघोली येथे ० ते ५ वयोगटातील मुलांसाठी मोफत आधार मेळावा‌..!!

स्वरूप गिरमकर 

शिरूर : शनिवार दिनांक २२ / ६ / २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाघोली पोस्ट ऑफिस येथे ० ते ५ वयोगटातील मुलांसाठी मोफत आधार मेळावा‌ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करुन मिळणार आहे. तरी वाघोली व परिसरातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन वाघोली पोस्ट ऑफिस तर्फे करण्यात आले आहे.या साठी पालकांनी आवश्यक कागदपत्रे जसे की पाल्याचे ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट,आई किंवा वडिलांचे आधार कार्ड, आणि बाळाला सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे अशी माहिती वाघोली पोस्ट ऑफिसचे पोस्टमन नामदेव गवळी यांनी दिली आहे. आपणास काही माहिती हवी असेल तर संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments