Type Here to Get Search Results !

वसईत भररस्त्यात माथेफिरू तरुणाकडून प्रेयसीची हत्या

 


आरतीचा रस्त्यात जीव गेल्यावरही रोहित तिच्यावर वार करतच होता..! 

मदत करण्याऐवजी लोकांनी केले चित्रीकरण

वसईच्या गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या २२ वर्षीय आरतीची प्रियकर रोहितने मंगळवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास भर रस्त्यात लोखंडी पान्याने १५ ते १६ वार करून निघृण हत्या केली. सहा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीच्या वागण्यावर रोहितला संशय होता. त्यांचा ब्रेकअप झाला होता. आरतीवर हल्ला होताना रस्त्यावरील लोक बघत होते. कोणीही या नराधम तरुणाला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. मदत करण्याऐवजी काहींनी या घटनेचे चित्रीकरण केले. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. तिच्या वागण्यावर संशय असल्याने दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यातून रोहित रामनिवास यादव (वय २२) याने रागाच्या भरात आरती रामदुलार यादव (वय २२) हिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपीने आरतीच्या डोक्यावर मागून लोखंडी पान्याने हल्ला केल्यामुळे ती रस्त्यात कोसळली. त्यानंतर तो तिच्यावर वार करीतच होता. मृत्यू झाल्यानंतरही तो तिच्यावर वार करतच होता.

                     आरती जमिनीवर कोसळल्यानंतरही माथेफिरू मृतदेहाजवळ राहिला बसून 

रोहित तिच्यावर वार करीत होता. हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळच बसून होता. वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरतीचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठविला आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.


दोघांमध्ये अनेक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्या मुलीला दुसरा मुलगा भेटल्याच्या संशयातून व रागाच्या भरात आरोपीने ही हत्या केल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे. - पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२


पोलिस म्हणतात आम्ही कारवाई सुरू केली होती

८ जूनला रात्री नालासोपारा येथील शिर्डीनगर परिसरात आरतीचा मोबाइल रोहितने फोडला होता. नुकसान भरून दे, असा आग्रह तिने धरला होता. तेव्हा रोहितने नकार दिल्यावर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला, पण दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले नाही. त्याच रात्री आरती बहिणीसोबत पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आल्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला होता. ९ जूनला सकाळी रोहितला बोलविण्यात आल्यावर तो हजर झाला होता. १२ वाजेच्या सुमारास आरती बहिणीसोबत पोलिस ठाण्यात आली. रोहितला पोलिसांनी खाक्या दाखविताच आरतीने पोलिसांना थांबविले. आमचे आम्ही मिटवून घेऊ, असे तिने सांगितले. तरी १४९ ची नोटीस देऊन कारवाई सुरू केली. --बाळासाहेब पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक



Post a Comment

0 Comments