निकुंभे गावात आ कुणाल पाटील यांच्या मार्फत शाळेत वह्या वाटप. व एकनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पाणी बाटल्या वाटप"
धुळे तालुक्यातील लामकानी परिसरातील निकुभे गावात आमदार बाबासो कुणालजी पाटील यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.सामाजिक कामात सदैव अग्रेसर असणारे आपल्या निकुंभे गावातील आमदार बाबासो कुणाल पाटील यांचे खंदे समर्थक कृषीमित्र ओम ऍग्रो सर्विसचे मालक श्री एकनाथभाऊ श्रीराम पाटील यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त एका अनोख्या पद्धतीने साजरा करीत गावातील जि प शाळेतील जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या. या आधीही एकनाथ भाऊंनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेत वेगवेगळे शालेय साहित्याचे व स्पोर्ट ड्रेस विद्यार्थ्यांना वाटप केले होते. लोकं वाढदिवसानित्त मित्रांसोबत पार्टयांमध्ये हजारो रुपये खर्च करीत असतात. पण एकनाथभाऊंचा हा अनोखा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. यासाठी मन मोठं लागतं आपण कोणाचे तरी देणे लागतो या उदात्त हेतूने अतिशय मोठ्या मनाने त्यांच्या या आदर्श संकल्पनेतून आज लहान लहान निरागस विद्यार्थ्यांच्या मनात आनंद भरीत आपला वाढदिवस साजरा केला आहे. खरंच एकनाथ भाऊची आपल्या गावाबद्दल आणि आपल्या शाळेबद्दल असलेली कृतज्ञता प्रेम, आस्था, यावरून लक्षात येते. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी व शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींनी
श्री. एकनाथ भाऊंचा मोठ्या आदराने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व वृक्ष देऊन सत्कार केला. व या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्यात.त्यावेळी उपस्थित श्री भिका तात्या वाघ, श्री दादाभाई पाटील सरपंच व अन्य मंडळी उपस्थित होती.

Post a Comment
0 Comments