Type Here to Get Search Results !

लुपिन फाऊंडेशनचा सामुदायिक दिवसाचा उपक्रम पेडकाई माता जंगल परिसरात १५०० सीडबॉलने बीजपेरणी


शिंदखेडा : पेडकाई माता परिसर अरण्यातील साळवे,मेथी गावाजवळ असलेल्या वनात लुपिन फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने १५०० सीडबॉलच्या माध्यमातून बीजपेरणी करण्यात आली. यानिमित्त लुपिन संस्थेकडून सामुदायिक दिन साजरा करण्यात आला.

लुपिन फाऊंडेशन संस्थेने विविध प्रकारची बिजवाई संकलित करूनत्यापासून १५०० सीडबॉल तयार केले. तयार करण्यात आलेले सीडबॉल लुपिन फाऊंडेशनची शिंदखेडा पी.यु.ची पूर्ण टीम सोबत टीम चे मॅनेजर श्री.बोरसे सर यांच्या मदतीने साळवे गावाजवळ असलेल्या पेडकाई आई जंगलात सीड बॉल टाकण्यात आले. लुपिन फाऊंडेशनचे कर्मचारी यांनी सीडबॉल थ्रो करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. या उपक्रमास धुळे जिल्हा प्रोजेक्ट युनिटचे बीसीआय प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रकल्प समन्वयक चंदन टोकशा, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील सर यांच्या सहमतीने उपक्रम राबविला.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीडबॉल थ्रो करण्यात आले. बेसुमार वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. वनजमिनीवरील वृक्षतोडीमुळे जंगालांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलांना पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी आज प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. यामुळे वृक्षारोपणाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे जाणवते.सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य भावनेतून प्रत्येकाने वृक्षारोपण करावे, असे मत व्यक्त करत पीयूचे व्यवस्थापक चेतन बोरसे सर यांचे समवेत महेंद्र गिरासे सर, विनोद पवार, प्रविण राजपूत, लोकेश,पाटील, जयेश पाटोळे, नितीन कोळी, विजय कोळी, मोहन नगराळे ,सचिन पावरा, राधा देसले, ऐश्वर्या राठोड, प्राची कोठावदे,रोशनी पाटील, यांच्या उपस्थित उपक्रम राबविले.


Post a Comment

0 Comments