Type Here to Get Search Results !

बांगलादेश मधील साधुसंत तसेच हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचार चा निषेध


मलकापूर 

बांगलादेश मधील साधुसंत तसेच हिंदूंवरील अत्याचार विरुद्ध तत्काळ उपाययोजना करून हिंदूंवरील अत्याचार थांबविण्या बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाकडून गृहमंत्री भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत निवेदन दिनांक 2 डिसेंबर रोजी  देण्यात आले. सदर निवेदनात नमूद केले आहे की बांगलादेशातील हिंदू, महिला आणि इतर सर्व अल्पसंख्यांकांवर इस्लामिक कट्टर वाद्यांकडून होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ तसेच अमानुष अत्याचार अत्यंत चिंताजनक आहेत.या सर्व घटनेचा आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल  याचा तीव्र शब्दात  निषेध व्यक्त  करत आहे .

हिंसा थांबविण्या ऐवजी सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा केवळ मूक प्रेक्षक बनून आहेत, बांगलादेशातील हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी लोकशाही मागणी उठवलेला आवाज दाबून टाकण्यासाठी अन्याय आणि अत्याचाराचा एक नवा टप्पा उदयास येत आहे,   अशा शांततापूर्ण निदर्शनामध्ये हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉन चे आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेश सरकारने तुरुंगात पाठवणे  अन्यायकारक  अन्यायकारक आहे. बांगलादेश पोलिसांनी सोमवारी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतनाचे (इस्कॉन) चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून चितगावला जात असताना अटक केली. हे इतपत थांबले नाही तर काल 

इस्कॉन मंदिराचे दुसरे पुजारी भिक्षू रामदास प्रभू यांना ही तुरुंगात जिहादी म्हणून डाबले .हिंसाचार ग्रस्त बांगलादेशातील हिंदू बांधवा वरील अत्याचार थांबविण्यात येऊन इस्कॉन चे आध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्ण दास व रामदास प्रभु यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्यात यावी. तसेच भारत सरकारने  हिंदू व इतर अल्पसंख्याकावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी  कठोर व तात्काळ पाऊल उचलावे  आणि साधू संत यांच्या समर्थनार्थ त्वरित जागतिक जनमत तयार करण्या साठी आवश्यक ती पावले उचलावी.  अशी मागणी आम्ही निवेदनातून करत आहोत.तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराच्या  सर्व घटनेचा आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, सकल हिंदू समाज तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहे.सदर निवेदनाच्या  प्रतीलीपी, मा.राष्ट्रपती महोदया,भारत सरकार दिल्ली, मा.जिल्हाधिकारी साहेब ,बुलढाणा यांना सुद्धा पाठवण्यात आल्या.

 या निवेदनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघ चालक ज्ञानदेवराव  पाटील, नगर संघ चालक दामोदर लखानी, नगर सह संघ चालक राजेश महाजन, विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण तायडे, बजरंग दल तालुका संयोजक दीपक कपले, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री सुयोग शर्मा, समस्त जिल्हा सहप्रमुख दीपक चवरे, विश्व हिंदू परिषद शहर अध्यक्ष मोहन सिंग राजपूत, शहर उपाध्यक्ष विशाल दवे, डॉ.जयंतराव राजुरकर  भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शंकरराव पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष बोंबटकार, श्याम भल्ला, निलेश लढा, प्रा. नितीन भोळे प्रवीण जैन, ईश्वर दीक्षित, दिलीप मालपाणी, बनसिदास बैरागी, भारतीय जनता पार्टी जैन प्रकोश  चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.  योगेश पटणी, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट सौ .अर्चना शुक्ला, प्रा. राजेंद्र पांडे. सुनील शुक्ला, डॉ. नितीन भुजबळ, धीरज वैष्णव,  रवींद्र जोशी, जितेंद्र आकोटकर, स्वप्निल जैन, यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments