जैताने प्रतिनिधी कमलेश भामरे
बांगलादेशात अत्याचार हिंदू समाज समितीची माहिती बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचार होत आहे. हिंदूंची मंदिरे, घरे जाळण्यात, तोडण्यात येत आहे. याला तेथील राज्यकर्ते ही जबाबदार आहेत. मागील काही काळात अनेक घटनासमोर आल्या आहेत. या विरोधात १० डिसेंबरला सकल हिंदू समाज समितीच्या वतीने सकाळी 8:00 वाजता भवानी माता मंदिर चौक मेन गल्ली बस स्टॅन्ड खुडाणी चौफुली आखाडे चौफुली ते पोलीस स्टेशन पर्यंत येथून निषेध मोर्चा निघणार आहे. यामध्ये अनेक हिंदू संघटना सहभागी होणार असल्याची माहिती सकल हिंदू समाज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली.
बांगलादेशातील इस्कॉन संस्थेचे संत हिंदू योद्धा चिन्मय दास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे. तसेच इस्कॉनला दहशतवादी संघटना ठरवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. बांगला भाषेच्या अस्मितेवर वेगळा झालेला बांगलादेश आता इस्लामी कट्टरवादाकडे वेगाने सरकत आहे, असा आरोपही सकल हिंदू समाज समितीने पत्रपरिषदेतून केला आहे. मोहम्मद युनूस यांच्या शासनामध्ये हिंदूंवरील अन्याय,अत्याचार वाढले आहेत. दुसरीकडे जग गप्प बसले आहे. बांगलादेशातील हिंदू युद्धा चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने सकल हिंदू समाज समितीच्या वतीने १० डिसेंबरला निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये इस्कॉन मंदिर, हिंदू जागरण, विहिंप, अधिवक्ता परिषद, भारतीय विचार मंच, मातृशक्ती परिवार हिंदू हुंकार, शिव सूर्य प्रतिष्ठान, पतंजली योग पीठ, हिंदू हुंकार संघटना, दुर्गा वहिनी यासारख्या हिंदू समाज संघटना सहभागी होणार आहेत या अनुषंगाने जैताणे व विजयपूर या गावात सुद्धा बांगलादेश सकल हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जाहीर निषेध म्हणून मोर्चा काढण्यात आला व निजामपूर पोलीस स्टेशन ला प्रभारी अधिकारी मयूर भामरे साहेब यांना त्यात निवेदन देण्यात आले यावेळी सकल हिंदू समाज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रसेविका समिती स्वाध्याय परिवार जैताणे विजयपूर, खुडाणे,फोफादे छावडी फोपरे, अशा अनेक गावाच्या सरपंचांनी व तसेच श्री राम मंदिर निर्माण ट्रस्ट समिती जैताने,विजयपूर

Post a Comment
0 Comments