गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी .
येथून जवळच असलेल्या ग्राम लोणी गवळी येथील दे. भ.श्री. हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे बाल आनंद मेळावा दि. 27 डिसेंबर ला उत्साहात संपन्न झाला. या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मुलांना आतापासूनच नफा तोटा, व्यवसाय आणि उद्योजकता त्याचे शिक्षण मिळावे या दृष्टीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असे प्राचार्य सुरेश हिवरकर यांनी सांगितले तसेच आपले विचार व्यक्त करताना अनेक वर्षापासून आमच्या शाळेमध्ये आम्ही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्या जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे हेच आमचे ध्येय आहे सदर आनंद मेळाव्या मध्येविद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ चे स्टॉल या ठिकाणी लावले होते त्यामुळे मुलांनी मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आनंद घेतला सदर आनंद मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुरेश हिवरकर तसेच पर्यवेक्षक एम. के. चव्हाण मेळाव्यासाठी उपस्थित होते सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षके तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले

Post a Comment
0 Comments