प्रतिनिधी : दशरथ दळवी
पालघर : दिनांक १७-१२-२०२४ पालघर मध्ये गेल्या दोन तीन दिवसांत एका पिसाळलेल्या घोड्याने धुमाकाळ घातला होता. रस्त्यावर ये-जा करणारे ३ जणांना चावा घेतला होता. नंतर पशु मित्र व पशुसंवर्धन वैद्यकीय यांनी या घोड्याला काही दिवस ताब्यात ठेवले होते. नंतर कळले की, या घोड्याला पिसाळलेला कुत्रा चावल्याने घोड्याला रेबीज झाले होते काही उपाय नसल्याने या घोड्याला इंजेक्शन देऊन संपवण्यात आले अशी माहिती मिळाली व ज्या ७ जणांना घोडा चावला होता त्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment
0 Comments