रत्नापिंप्री शरद पाटील
पारोळा तालुक्यातील होळपिंप्री येथे कानबाई माता महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. सूर्यवंशी परिवाराने कानबाई मातेच्या उत्सवाचे आयोजन केले आहे. कानबाई मातेच्या उत्सव १६ ते १९ डिसेंबर असा चार दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त गावात धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या उत्सवासाठी महिलांनी प्रत्येकाच्या घरासमोर सडा, रांगोळी टाकून परिसर स्वच्छ केला आहे.
उत्सव सुरू होताच अत्यंत थंडीच्या वातावरणात देखील कार्यक्रमासाठी मोठी धावपळ दिसून येत आहे. दैनंदिन कार्यक्रमात १६ डिसेंबर रोजी भगत, गवरर्णी, आगमन, राजपूजन, गहू दळण. १७ डिसेंबर रोजी भूमिपूजन कुदळी टाकने, पाणी आणणे, दार बंद करणे, रात्रीचे कानबाई मातेचे भजन, गीतगायन. दि. १८ डिसेंबर रोजी रत्न आणणे, दार उघडणे, भोजन बनवणे, कानबाई माता मिरवणूक लग्न लावणे, थाट भरणे, महासाद तसेच रात्री जागरण करणे. दि.१९ रोजी सकाळी कानबाई मातेचे विधिवत विसर्जन करणे आदी कार्यक्रम होणार आहेत.
कानबाई माता उत्सवासाठी जल कलश घरी आणताना महिला भाविक. कार्यक्रमात गावातील आबालवृद्धांचा सहभाग कार्यक्रमासाठी सूर्यवंशी परिवाराने मोठा सहभाग नोंदवला आहे. यावेळी नीलू भगत व अभिजीत जोशी यांच्या मार्गदर्शनाने भव्य कार्यक्रम साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला आहे. न्यू सार्वजनिक मित्र मंडळव होळपिंप्री, रत्नापिंप्री, दवापिंप्री ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments