डोणगाव. अंजनी बु फाटयाजवळून मुंबई ते नागपूर हा राज्य महामार्ग जातो सदर महामार्गोवर सदैव वाहतूक सुरू असते पण अंजनी बु. फाट्यावरून अंजनी कडे कलताना राज्य महामार्गोवर असणारे वाहने वेगात असतात अशावेळी एखाद्या मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अंजनी बु फाटयाजवळ राज्य महामार्गोवर गतीरोधक बसवावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे सखाराम काळदाते.
मोहन बंगाळे सह गावकरी यांनी केली आहे. मेहकर ते डोणगाव राज्य महामार्गोवर अंजनी बु फाट्यावरून अंजनी कडे जाणारा रस्ता आहे परंतु या राज्य महामार्गोवरून वाहने भरधाव वेगाने वाहतात व अंजनी बु कडे वळताना या भरधाव वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अंजनी बु फाटयाजवळ राज्य महामार्गोवर गतीरोधक व अंजनी रोडवर गतीरोधक बसवावे अशी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments