Type Here to Get Search Results !

वर्ग खोल्या नाही उघड्यावर भरवावी लागते जिल्हा परिषद उर्दू शाळा.




 गजानन वाघमारे डोणगांव प्रतिनिधी:-

वर्गखोल्या नाही उघड्यावर भरवावी लागते शाळा, डोणगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेतील प्रकार. शाळा 1 ते 4 विध्यार्थी संख्या 340 तुकड्या 11,वर्ग खोल्या 8 ज्याने तीन वर्गाना उघड्यावर बसावे लागते. डोणगाव मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद उर्दू शाळा मध्ये बसायला असुविधा आहेत तीन वर्गाना बसायला खोल्या नाहीत तर विध्यार्थी संख्येच्या हिशोबाने शौचालय नाहीत तेव्हा काही वर्गात 70 पेक्षा जास्त विध्यार्थी बसतात तर तीन वर्ग झाडाखाली भरवल्या जातात यावर प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही तालुक्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद उर्दू शाळा मूलभूत सुविधे पासून वंचित असून सुद्धा शिक्षण विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. एकीकडे सरकारी शाळांना घरघर लागलेली असून दिवसेंदिवस विध्यार्थी संख्या अभावी शाळा बंद पडत आहेत त्याला पाहता शासन विविध उपाय योजना राबवत असून त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नसतांना दुसरीकडे डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळे मध्ये दरवर्षी विध्यार्थी संख्या वाढत आहे मात्र उदासीन शिक्षण विभागाने येथे अद्याप परियंत विध्यार्थी संख्येला अनुसरून वर्ग खोल्या, पिण्याच्या पाण्याची सोय,शौचालय नाहीत. 

डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत 1 ते 4 परियंत शिकणारे 340 विध्यार्थी असून 11 शिक्षक असून 11 तुकड्या आहेत वर्ग खोल्या मात्र 8 असल्यामुळे काही वर्गात 70 विध्यार्थी दाटीवाटीने कोंबून बसवण्यात येतात तर काही वेळा झाडाखाली बाहेर त्यांना शिकवल्या जाते तेव्हा शिक्षण विभागाने यावर उपाय योजना करावी या साठी पालकांनी 15 फेब्रुवारी रोजी आंदोलन केले होते त्यावर माझी आमदार डॉ संजय रायमूलकर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन मध्ये तारांकित प्रश्न म्हणून जिल्हा परिषद शाळेची अवस्था मांडली होती हे सर्व घडून गेखील अद्याप परियंत कोणतीच उपाय योजना झालेली नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. ( जिल्हा परिषद प्रशासनाने जर आमच्या पाल्याच्या शाळेचा विचार करून त्यांना वर्ग खोल्या,विध्यार्थी संख्ये नुसार शौचालय दिले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करून जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवू - जमीर शाह पालक ) शाळेच्या इमारत मंजूर झालेली आहे व शासनस्तरावर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू होईल तोपर्यंत अडचण आहे. शालेय स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे श्री रब्बानी सर मुख्याध्यापक उर्दू शाळा डोणगाव.

Post a Comment

0 Comments