Type Here to Get Search Results !

अतनुरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी

 



अतनूर / प्रतिनिधी 

१२ जानेवारी हा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंतीदिन तथा ' राष्ट्रीय युवा दिन ' म्हणून जळकोट तालुक्यातील अतनूर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या जयंती दिनानिमित्त शिवाजी चौकात माँ.जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या तैलचिञास पुष्पहार अर्पण करून सर्वपक्षीय विनम्र अभिवादन करण्यात आले. शिवसेनेचे जळकोट तालुकाअध्यक्ष मुक्तेश्वर येवरे पाटील, जिल्हा सरचिटणीस जिल्हाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक एफ.एफ.शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, युवानेते संभाजी गव्हाणे-पाटील, काँग्रेस युवकचे घोणसी विभागप्रमुख कैलास सोमुसे-पाटील, युवानेते साहेबराव येवरे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते बी.जी.शिंदे, युवा नेते दिलीपराव गव्हाणे पाटील, ज्ञानोबा पाटील , रमेश यादव जाधव मामा, ग्रामपंचायत सदस्य प्रभुदास गायकवाड, पत्रकार एस.जी.शिंदे, प्रमोद संगेवार, तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, बालाजी येवरे, चंद्रकांत गायकवाड, व्यंकटेश शिंदे, संग्राम घुमाडे, सूर्यकांत येवरे, महाराष्ट्र बांधकाम व इमारत कामगार मंडळाचे आरोग्य सहाय्यक सतीश फुलारी, बबलू चव्हाण, विलास सोमुुसे, माधव सोोमुसे , रवी पांचाळ तसेच अतनूर येथील विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळ, सामाजिक संस्था तसेच लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर यांच्या कार्यालयातही जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बी.जी.शिंदे हे होते. तर प्रमुखपाहुणे म्हणून विधावर्धिनी इंग्लिश स्कुलचे प्राचार्य व्ही.एस.कणसे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, पत्रकार बालासाहेब शिंदे, किशन मुगदळे, महिला प्रदेशध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, सौ.शुभांगना कणसे, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रूक्मीण सोमवंशी, सचिव सौ.संध्या शिंदे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.शोभा शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, गव्हाणे-पाटील, येवरे-पाटील, शिंदे-पाटील, वाघमारे, कांबळे, गायकवाड, मुंजेवार, आत्तार, शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरी शिंदे यांनी केले.तर आभार व्यंकटेश शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments