गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम हिवरा साबळे येथे डोणगाव पोलीस स्टेशन च्या कर्मचारी यांनी धाड टाकून 6जुगारी यांना 75 हजाराचा मुद्देमालासह पकडल्याची घटना दि. 24 डिसेंबर ला दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशा प्रकारे आहे की,दि. 24 डिसेंबर ला दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास हिवरा साबळे शिवारात भुजंग नथ्थुजी खरात यांच्या शेतात मिळालेल्या गुप्त खबरप्रमाणे पंचासमक्ष पोलीसांनी जुगार रेड केला असता आरोपी 1) शिवाजी प्रल्हाद वाघ वय 57 वर्ष रा हिवरा साबळे ता. मेहकर 2) संतोष एकनाथ खेलबाडे 40 वर्ष रा हिवरा साबळे ता. मेहकर 3) राजु चद्रप्पा भुसारे वय 50 वर्ष रा हिवरा साबळे ता. मेहकर 4) समाधान आनुआप्पा दयाळ वय 55 वर्ष रा. जवळा ता. मेहकर 5) भुजंग नथ्थुजी खरात वय 67 वर्ष रा. जवळा ता.मेहकर 6) भावराव पांडुरंग देबाजे वय 51 वर्ष रा. जवळा ता. मेहकर हे पैसाचे हरजितवर एक्का बादशा नावाचा 52 ताश पत्ते जुगार पैश्याचे हारजीवर खेळतांना मिळुन आले त्याचे अंगझडती मध्ये 670 रुपये व 05 मोबाइल किमंत 22000/- रुपये व 02 मोटार सायकल किमंत 52000/- रुपये व डावावर नगदी 140 रुपये व 52 तासपत्ते किमंत 50 अशा एकूण 74860 रुपयेचा जुगाराचा माल मिळून आला. सदर आरोपी विरूद्ध कलम 12 (A) महा. जु.का.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यास दोषारोप पत्र दाखल करते वेळी हजर राहण्याबाबत-भा.मा.सु.सं. 2023 कलम 35(3) प्रमाणे सुचना पत्र देवुन रिहा करण्यात आले. सदर गुन्हा तपास तपास ठाणेकर अमरनाथ नागरे यांच्या आदेशानुसार सा. आदेशाने तपासपोहेका कैलास गावडे यांचेकडे देण्यात आला.

Post a Comment
0 Comments