गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी
:-डोणगाव ग्रामपंचायत सध्या विविध कारणांनी गाजत असतांना असताना डोणगाव येथील ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे यांना झालेल्या विविध तक्रारी मुळे व खासकरून डोणगाव येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यांवरून निलंबित करण्यात आले व त्यांच्या जागी नवीन ग्रामविकास अधिकारी विजय दांडगे यांची नेमणूक करण्यात आली परंतु दि. १७ जुलै ला कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना एक पत्र दिले त्यामध्ये त्यांनी ज्या कारणास्तव ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे यांना निलंबित केले आणी नविन ग्रामविकास अधिकारी डोणगाव ला दिला त्या ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून तांबारे यांनी न काढलेल्या अतिक्रमण काढण्याची कारवाई सात दिवसांत करुन घ्यावे व ज्या कारणासाठी तांबारे निलंबित करण्यात आले त्या कारणास्तव नवीन ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे काम पडू नये असे नमूद आहे.
(डोणगाव हे मेहकर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे या ठिकाणी मुख्यालयी राहणारा ग्रामपंचायत अधिकारी मिळणे आवश्यक आहे. पण डोणगाव येथे येणारे ग्रामपंचायत अधिकारी हे डोणगाव येथे न राहता इतर ठिकाणाहून येजा करीत असल्याने समस्या निर्माण होत आहे त्यामुळे मुख्यालयी राहणारा ग्रामपंचायत अधिकारी डोणगाव ला द्यावा अन्यथा डोणगाव येथे मुख्यालयी न राहणार्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.) (मी डोणगाव चा पदभार १७ जुलै ला घेतला असून अतिक्रमणाबाबत माहीती घेऊन सरपंच व सदस्य यांच्यासह नियमानुसार कारवाई करण्यात येईल. विजय दांडगे ग्रामविकास अधिकारी डोणगाव)

Post a Comment
0 Comments